'ऑपरेशन बँक'... बचत खातेदारांचा भयंकर विश्वासघात!

आज आम्ही आणखी एक खळबळजनक खुलासा करणार आहोत... बँकिंग क्षेत्रातल्या धोकेबाजीचा... 'ऑपरेशन बँक'... माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे या धोकेबाजीचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. बँकांमध्ये ठेवलेली ग्राहकांची रक्कम सुरक्षित आहे का? कशी होतेय ग्राहकांची फसवणूक? यावरचा हा खास रिपोर्ट...

Updated: Apr 8, 2015, 06:12 PM IST
'ऑपरेशन बँक'... बचत खातेदारांचा भयंकर विश्वासघात! title=

मुंबई : आज आम्ही आणखी एक खळबळजनक खुलासा करणार आहोत... बँकिंग क्षेत्रातल्या धोकेबाजीचा... 'ऑपरेशन बँक'... माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे या धोकेबाजीचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. बँकांमध्ये ठेवलेली ग्राहकांची रक्कम सुरक्षित आहे का? कशी होतेय ग्राहकांची फसवणूक? यावरचा हा खास रिपोर्ट...
 
'झी मीडिया'ला माहितीच्या अधिकारातून देशातल्या तमाम बँकांकडून जी माहिती मिळालीय, त्यानुसार गेल्या पाच वर्षांत बँक खात्यांमधून तब्बल 27 हजार 800 कोटी रूपयांची रक्कम गायब झालीय. ही रक्कम कुणीतरी हडप केलीय... हा तुमचा पैसा आहे... तुम्ही विश्वासानं बँकांमध्ये ठेवलेला... मात्र बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तुमचा विश्वासघात केलाय.
 
बँकांमधील 7 हजार कर्मऱ्यांनी हा डल्ला मारलाय. बँक शाखांमध्ये कार्यरत स्टाफ किंवा त्यांच्या संघटित गँगनं ही रक्कम लुटलीय. 27 हजार 800 कोटी रूपयांच्या चोरीसाठी जी मोडस ऑपरेंडी वापरण्यात आली, त्यामध्ये...

  • बनावट चेकने रक्कम काढणे

  • एटीएम कार्डचा पिन चोरी करणे

  • इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड हॅक करणे

  • काऊंटरवर जमा केलेली रक्कम खात्यात जमा न करणे

  • बोगस कर्ज घेऊन गायब होणे

अशा प्रकारांचा समावेश होता. या घोटाळ्याचा सर्वात मोठा फटका बसलाय तो सरकारी बँकांमध्ये खाती असलेल्या ग्राहकांना... सरकारी बँकांतून सुमारे 24 हजार कोटी रूपयांची रक्कम गायब झालीय. तर खासगी बँकांतील 4 हजार कोटी रूपयांचा हिशेब द्यायला कुणी तयार नाही. आरटीआयच्या माध्यमातून मिळालेली ही आकडेवारी... याबाबत बँकांकडे विचारणा केल्यावर या प्रकारावर बोलणं ते टाळताना दिसतायत. ग्राहक आणि बँकांची राजरोस सुरू असलेली लूट... यात ग्राहकांचं कमी, पण बँकांचं जास्त नुकसान झालंय, असं अधिकारी सांगतायत.  

बँकांची ही धोकेबाजी अशावेळी समोर आलीय, जेव्हा सरकार जनधनसारख्या योजनांवर मोठी शक्ती खर्च करतंय. बचत करण्यासाठी लोकांना आवाहन करतंय... पण ग्राहकांचा हा बचतीचा पैसा बँकांमध्ये खरोखरच सुरक्षित आहे का? 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.