सावधान... अग्निरोधकांचा वापर ड्रग्ज बनवण्यासाठी होतोय!

तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या नशेच्या जगात रोज नवनवे बदल होत असतात. आता नशेच्या या दुनियेत आणखी एका नव्या पदार्थाची भर पडलीय... आणि हा पदार्थ सर्वांनाच चक्राऊन सोडणारा आहे.

Updated: Apr 8, 2015, 03:59 PM IST
सावधान... अग्निरोधकांचा वापर ड्रग्ज बनवण्यासाठी होतोय! title=

मुंबई : तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या नशेच्या जगात रोज नवनवे बदल होत असतात. आता नशेच्या या दुनियेत आणखी एका नव्या पदार्थाची भर पडलीय... आणि हा पदार्थ सर्वांनाच चक्राऊन सोडणारा आहे.

व्हाईटनर, आयोडेक्स, कफ सीरप, गोंद, झोपेच्या गोळ्या... नशेच्या बाजारातली ही काहीशी परिचीत नावं... मात्र, नशेच्या या बाजारात दिवसागणिक नवनव्या पदार्थांची भर पडतेय. कुर्ल्यातील कपाडिया नगर येथील रहिवाशांच्या तक्रारीवरून कुर्ला पोलिसांनी 'सोसायटी मेडिकल' या औषधाच्या दुकानावर धाड टाकली. यावेळी या मेडिकल स्टोअरमध्ये डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकली जणारी अनेक औषधं जप्त केली गेल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद शिंदे यांनी दिलीय.  

धक्कादायक बाब म्हणजे या औषध विक्रेत्याकडे 75 अग्निरोधक (fire extinguisher) मिळाले असून त्याचा वापर नशिले पदार्थ बनवण्यासाठी होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केलीय. 

नागरीकांच्या या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आम्ही रसायन तज्ज्ञांकडून माहिती घेतली. तेव्हा आमच्या टीमलाही धक्काच बसला. या अग्निरोधकांचा फवारा विशिष्ठ औषधांवर मारल्यास त्यापासून 'कोकेन' किंवा 'एमडी' या पेक्षाही खतरनाक नशिले पदार्थ निर्माण करता येतात.

औषध विक्रीच्या नावाखाली नशेचा व्यापार करणाऱ्या या केमिस्टचा औषध विक्रीचा परवाना दोन वेळा रद्द करण्यात आलाय. मात्र तरीही त्याला पुन्हा परवाना कसा मिळाला? यामागे कोणा बड्या व्यक्तीचा हात आहे का? असे सवालही या निमित्तानं उपस्थित झालेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.