एमयआयएमची डीएनए टेस्ट करायला हवी - संजय राऊत

एमआयएमने बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकाला केलेल्या विरोधानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 

Updated: Jun 6, 2015, 07:52 PM IST
एमयआयएमची डीएनए टेस्ट करायला हवी - संजय राऊत  title=

मुंबई : एमआयएमने बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकाला केलेल्या विरोधानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 

एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी बाळासाहेब ठाकरे, शिवाजी महाराज आणि गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला विरोध केला आहे. राज्यात रुग्णालये बांधण्यासाठी जागा नाही आणि सरकारी पैशातून स्मारके बांधू नये. स्मारके बांधायचे असतील तर खासगी पैशातून स्मारंक बांधण्यात येवीत असेही जलील यांनी सांगितले होते. 

एमआयएमची DNA टेस्ट करण्याची गरज आहे. त्यांचे प्रेरणास्त्रोत पाकिस्तानात असल्याचा केला आरोप राऊत यांनी केला. एमआयएमने विरोध करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा का नाही केला उल्लेख? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

सरकारी खर्चाने होणाऱ्या स्मारकांना विरोध करत असाल तर सरकारी खर्चाने मिळणाऱ्या हज कमिटीला सबसीडी ही बंद कराव्यात का? हा सामाजिक आणि धार्मिक तेढ़ निर्माण करण्याचा एमआयएमचा प्रयत्न असल्याचा दावाही राऊत यांनी केला. 

जनतेसाठी आयुष्य खर्ची घातलेल्या महापुरूषांच्या स्मारकासाठी जनतेचा पैसा खर्च होत असेल तर तो अपव्यय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.