लिलावानंतर आता होमी भाभांच्या बंगल्याची सरकारला काळजी

Updated: Jun 24, 2014, 06:05 PM IST
लिलावानंतर आता होमी भाभांच्या बंगल्याची सरकारला काळजी title=

 

मुंबई: शास्त्रज्ञ होमी जहांगिर भाभा यांचा बंगला विकत घेण्यासाठी केंद्रसरकारनं पुढाकार घेतलाय. बॉम्बे हायकोर्टात केंद्रसरकारनं हा बंगला खरेदी करण्याचा विचार असल्याचं सांगितलंय. या बंगल्याचं म्युझियममध्ये रुपांतर करण्याचा सरकारचा विचार आहे. 

दक्षिण मुंबईतल्या मेहरा नगरीमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी या बंगल्याचा लिलाव करण्यात आला. एका उद्योगपतीनं 372 कोटींमध्ये हा बंगला त्यावेळी खरेदी केला. 

या बंगल्याचा लिलाव रोखला जावा यासाठी भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतील होती. त्यानंतर या प्रकरणी केंद्र सरकारनं पुढाकार घेतला. याप्रकरणी आता 30 जूनला पुढची सुनावणी होणारय.    

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.