मनसेकडून युतीचा प्रस्तावच नाही - संजय राऊतांचा प्रतिदावा

शिवसेना-मनसे युती होणार नसल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी मनसेच्या युतीसंदर्भातल्या प्रस्तावावरून अजूनही शिवसेना-मनसेत वाद सुरू आहेत. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 31, 2017, 06:25 PM IST
मनसेकडून युतीचा प्रस्तावच नाही - संजय राऊतांचा प्रतिदावा title=

मुंबई : शिवसेना-मनसे युती होणार नसल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी मनसेच्या युतीसंदर्भातल्या प्रस्तावावरून अजूनही शिवसेना-मनसेत वाद सुरू आहेत. 

मनसेनं युतीचा कोणाताही प्रस्ताव दिला नसल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. मात्र राऊतांचा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खोडून काढला आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे फोन उचलत नसल्यामुळं संजय राऊत यांना फोन केल्याचा प्रतिदावाही नांदगावकरांनी केला आहे. 

यापूर्वी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपण मातोश्रीवर जाऊन शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता, पण तो स्वीकारण्यात आला नसल्याचं म्हटलं होतं, त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेकडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं म्हटलं आहे.