मनपा आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही - शेलार

महापालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्याने दरवर्षी पाणी साचून रेल्वेचा खोळंबा होतो. त्यामुळे या दोन यंत्रणात अधिक समन्वयाची गरज असल्याचं मत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केलंय. रेल्वेच्या नाल्यांची पाहणी केल्यानंतर पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांना त्यांनी सूचनाही केल्या.

Updated: May 26, 2016, 11:45 PM IST
मनपा आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही - शेलार title=

मुंबई : महापालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्याने दरवर्षी पाणी साचून रेल्वेचा खोळंबा होतो. त्यामुळे या दोन यंत्रणात अधिक समन्वयाची गरज असल्याचं मत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केलंय. रेल्वेच्या नाल्यांची पाहणी केल्यानंतर पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांना त्यांनी सूचनाही केल्या.

पश्चिम रेल्वेच्या हद्दीतल्या नालेसफाईच्या कामाची आज त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पश्चिम रेल्वेचे डीआरएम आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसंच महापालिकेचे वॉर्ड ऑफीसर आणि घनकचरा व्यवस्थापनाचे अधिकारीही उपस्थित होते. खार सबवे, स्विपर कॉलनी जवळील हरीजन नाल, माहीम कॉजवे आणि वांद्रे टर्मिनन्स कडील चमडावाडी नाला यासह रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या छोट्या नाल्यांची पाहणी करून कामाचा आढावा आमदार आशिष शेलार यांनी घेतला. यावेळी उपमहापौर अलका केरकर उपस्थित होत्या.