मुंबई : मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा परप्रांतियांना मारहाण सुरू केली आहे. विक्रोळी पार्कसाईट येथील अमृतनगर इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना मारहाण केली. नाशिकवरून थेट भाजीविक्रीसाठी आलेल्या शेतक-यांना भाजी विकण्यास मनाई करणा-या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. दरम्यान मनसेच्या पदाधिका-यांनी आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन घडलेला प्रसंग सांगितला.
शासनाच्या अध्यादेशानुसार नाशिक मधील मराठी शेतकरी घाटकोपरमधे आपला शेतीमाल विकण्यासाठी आला असताना परिसरातील परप्रांतीय फेरिवाल्यांनी त्याला तसे करण्यास मज्जाव केला. शेतकरी स्वत: तक्रार घेऊन मनसेकडे आल्याने त्यात पदाधिकाऱ्यांना लक्ष घालावे लागले. परप्रांतीय फेरीवाले दादागिरीच्या भाषेत बोलू लागल्याचा मनसे पदाधिकारी आणि शेतकऱ्याचा आरोप आहे. त्यातून पुढला प्रकार घडला असे मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परप्रांतीय फेरिवाल्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे..
घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय भाजीविक्रेत्याला केलेल्या मारहाणीवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी टीका केलीये. घाटकोपरच्या चिरागनगर पोलीस ठाण्यात जाउन निरुपम यांनी फेरीवाल्यांना संरक्षण देण्याची मागणी केली...