मॅट्रीमोनिअल साईटवर लग्नाचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक

उच्च शिक्षित असूनही कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकीला बळी पडण्याचा प्रकार मुंबईत घडलाय. परदेशी नागरीक असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवून मुंबईत एका महिलेला तब्बल १ कोटी रुपयांचा गंडा एका टोळीने घातलाय. मॅट्रीमोनिअल वेबसाईटवर खोटे प्रोफाईल बनवून व्यवसायाकरीता पैसे पाहिजे असल्याचे सांगून ही फसवणूक करण्यात आलीये. या प्रकरणी पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

Updated: Oct 15, 2015, 05:15 PM IST
मॅट्रीमोनिअल साईटवर लग्नाचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक  title=

अजित मांढरे, झी मीडीया, मुंबई : उच्च शिक्षित असूनही कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकीला बळी पडण्याचा प्रकार मुंबईत घडलाय. परदेशी नागरीक असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवून मुंबईत एका महिलेला तब्बल १ कोटी रुपयांचा गंडा एका टोळीने घातलाय. मॅट्रीमोनिअल वेबसाईटवर खोटे प्रोफाईल बनवून व्यवसायाकरीता पैसे पाहिजे असल्याचे सांगून ही फसवणूक करण्यात आलीये. या प्रकरणी पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

मुंबईत आमिषाला बळी पडणा-यांची संख्या तशी कमी नाही. त्यात आता उच्च शिक्षितांच्या फसवणुकीचे प्रकार आणि ऑनलाईन मॅट्रीमोनिअल साईटसवर लोकांची फसवणूक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. असाच एक प्रकार समोर आलय मुंबईत. ओळख  नसतानाही फक्त परदेशी नागरीक आहे म्हणून देशातील एका मोठ्या एन्टरटेनमेंट कंपनीच्या मुख्याधिकारी महिलेने स्वत:ची तब्बल १ कोटी रुपयांपेक्षा जास्तीची फसवणूक करुन घेतली.

धक्कादायक म्हणजे पैशांचे हे व्यवहार होत असताना ती महिला एकदाही संबंधीत व्यक्तीला भेटली नाही. आणि तिने फक्त परदेशी नागरीक आहे आणि त्याच्याशी आपले लग्न होणार विश्वासावर १ कोटींचा व्यवहार केला.

या प्रकरणातील महिला ही ४५ वर्षीय असून लग्नाकरता मॅट्रीमोनिअल वेबसाईटवर तिझी एका परदेशी नागरीकाशी ओळख झाली. ती त्याच्या प्रेमात पडली. हे प्रेम तिने इतक्या आंधळेपणाने केले की, त्यात तिझी फसवणुक होतेये याकडे तिने दुर्लक्ष केले. पण, जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा तिच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण नायजेरीयन युवकांच्या टोळीने तिची फसवणूक केली होती.

या प्रकरणातील आरोपी हे नायजेरीयन देशांचे नागरीक आहेत. २००९ साली नायजेरीयन युवकांची ही टोळी मुंबईत आली होती. तेव्हा पासून आज पर्यंत मॅट्रीमोनिअल वेबसाईटवर खोटे प्रोफाईल बनवून या टोळीने जवळपास १२ महिलांना कोट्यावधी रुपयांना गंडा घातल्याचे सह पोलिस आयुक्यत अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. 

पोलीसांनी या प्रकरणी दोन नायजेरीयन युवकांना मालवणी येथून अटक केलीये. त्यांच्याकडून १० मोबाईल फोन, १९ सिमकार्ड (( १३ परदेशी, ३ भारतीय ), ४ लॅपटाॅप, डेटा कार्ड, बनावट आणि फेरफार केलेले पासपोर्ट हस्तगत केलेत.

काय सांगितलं कारण 
वडीलांच्या कॅंसरसाठी भारतात औषधे स्वस्त मिळतात, भारतात आलो की पैसे परत देतो तसच बिझनेससाठी पैसे पाहिजेच असं सांगून या टोळीने महिलेकडून पैसे उकळले होते.

धक्कादायक प्रकार म्हणजे स्थानिक भारतीयांनी या नायजेरिन युवकांना मदत केल्याने त्यांनी हा फसवणुकीचा प्रकार सुरु ठेवला होता. ओळखी शिवाय मोठ्या सोसायटी मध्ये भाड्याने घर मिळवून देणे, कोणतेही वैध कागदपत्र नसताना बॅंकेत खाते उघडून देणे अशा प्रकारची मदत या नायजेरीयन युवकांना करणा-यांवर देखील पोलीस आता गुन्हा दाखल करणार आहेत. पण, मुळात भावनिक आधारवर पैशांचे व्यवहार न करता प्रॅक्टीकल विचार करुन पैशांचे व्यवहार केले तर नक्कीच अशा फसवणुकीपासून लोक दूर राहतील.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.