'एटीएम'मध्ये पैसे रिफिल करायला गेलेल्या गाडीवर 'फिल्मी' दरोडा

मुंबईत एक आगळीवेगळी दरोड्याची घटना समोर आलीय. एखाद्या चित्रपटातील दरोडा वाटावा अशीच ही घटना घडलीय.

Updated: Jan 17, 2015, 11:29 AM IST
'एटीएम'मध्ये पैसे रिफिल करायला गेलेल्या गाडीवर 'फिल्मी' दरोडा title=

मुंबई : मुंबईत एक आगळीवेगळी दरोड्याची घटना समोर आलीय. एखाद्या चित्रपटातील दरोडा वाटावा अशीच ही घटना घडलीय.

बँकेच्या 'एटीएम'मध्ये पैसे रिफिल करणाऱ्या एजन्सीच्या सिक्युरिटी ट्रान्स गाडीतील तब्बल दोन कोटी रुपये दरोडेखोरांनी लंपास केल्याची घटना समोर आलीय. 

या गाडीत तब्बल २ कोटी ३६ लाख रुपयांची रोकड होती. मात्र, दरोडेखोर १ कोटी ९५ लाख रुपये घेऊन गेले... त्याचं कारण म्हणजे इतर नोटा शंभराच्या होत्या आणि त्यांचं वजन जास्त असल्यानं त्या तिथेच सोडल्या.

या गाडीत चार सुरक्षा गार्डही होते. मात्र, त्यांच्यातीलच एका सदरे आलम नावाच्या गार्डनं आपल्या इतर साथीदारांसोबत ही लूट केल्याचं समजतंय.

अशी शिजली डाळ... 
मुंबईच्या कमला मिल्स कंपाऊंड येथून पैसे लोड केल्यानंतर वरळी नाक्यावर पोहोचताच आलमने इतर गार्डसना 'मला एका माणसाला पैसे द्यायचे आहेत तोपर्यंत तुम्ही चहा घ्या' असं सांगितलं. त्या चहामध्येच गुंगीचं औधष होतं आणि त्यामुळे गाडीतले इतर तीन गार्ड बेशुद्ध झाले... 

त्यानंतर, अगोदरपासूनच या गाडीचा पाठलाग करत असलेल्या कारमधील तीन तरुणांनी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ विलेपार्ले येथे ट्रान्स सिक्यूरिटी गाडीतून चोरट्यांनी रोकड लंपास करुन धूम ठोकली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.