मालाडमधल्या ४२ मजली इमारतीला आग, जीवितहानी नाही

मुंबईत मालाड परिसरात ओमकार अपार्टमेंटला शुक्रवारी मध्यरात्री आग लागली होती. त्यातल्या त्यात या दुर्घटनेत कोणताही जीवीतहानी झाली नाही, ही सुदैवाची बाब...

Updated: Jan 17, 2015, 10:58 AM IST
मालाडमधल्या ४२ मजली इमारतीला आग, जीवितहानी नाही title=

मुंबई : मुंबईत मालाड परिसरात ओमकार अपार्टमेंटला शुक्रवारी मध्यरात्री आग लागली होती. त्यातल्या त्यात या दुर्घटनेत कोणताही जीवीतहानी झाली नाही, ही सुदैवाची बाब...

मालाडमध्ये नव्यानं उभ्या राहत असलेल्या या इमारतीचं बांधकाम अजूनही सुरू होतं. तब्बल ४२ मजल्यांची ही इमारत आहे. शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास या इमारतीला गंभीर आग लागली. आग विझवण्यासाठी लागलीच घटनास्थळी अग्निशमनदलाच्या १० पेक्षा जास्त गाड्या उपस्थित झाल्या होत्या. उंच इमारत असल्यानं आगीवर ताबा मिळवण्यासाठीही बरेच प्रयत्न करावे लागले. पोलिसांनी प्रसंगावधान राखत आजुबाजुचा परिसरही रिकामा केला होता. 

अखेर सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले. तरी तोपर्यंत आगीत इमारतीचे १७ मजले भस्मसात झाले.  
 
 अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. वारंवार अशा घडणाऱ्या घटनांमुळे उंच इमारतीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.