मुंबई : NCP चा पाठिंबा आम्ही स्वीकारला नसला तरी तो नाकारला नाही, असे सांगत काँग्रेसने अनेक काळ सत्ता भोगल्याने त्यांना पोलची मागणी करण्यास विसर पडला. आमच्याकडे बहुमत नाही, असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा. काँग्रेसने अविश्वासदर्शक ठराव आणावा आम्ही त्याला सामोरे जाऊ, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
अविश्वासदर्शक ठरावावरील पूर्ण प्रक्रिया होत असतांना कोणी पोल मागितला नाही. यापूर्वी अनेकांनी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला होता. ही काही पहिल्यांदा घडलेली घटना नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.
ज्यांना पोल मागायचा होता त्यांनी पोल मागितला नाही, काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत असल्याने ते पोल मागायला विसरले असावेत, असा टोला त्यांनी लगावला. संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर मार्गाने पूर्ण केली आहे. आम्ही विश्वासदर्शक ठरावला समोर जायला तयार आहोत , काँग्रेसने तो मांडावा, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसला वाटत असेल हे सरकार बेकायदा आहे. तर त्यांनी राज्यपाल, राष्ट्रपती यांच्याकडे जावे. नाहीतर हायकोर्टात जावे. आम्ही बहुमत कधीही सिद्ध करू शकतो, ज्यांना वाटते त्यांनी अविश्वासदर्शक ठराव आणवा, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.