मुंबई: आवाजी मतदानानं भाजप सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला. पण शिवसेना आणि काँग्रेस पक्षानं त्यावर आक्षेप घेत पुन्हा विश्वासदर्शक ठराव घेण्याची मतदानाची मागणी केलीय. यावर बोलतांना राष्ट्रवादी काँग्रसचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेवर घणाघाती आरोप केलाय. जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा शिवसेनेचे आमदार सभागृहाबाहेर गेले, असं भुजबळ म्हणाले.
पाहा व्हिडिओ- काय म्हणाले भुजबळ -
तर शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. छगन भुजबळ अत्यंत चुकीची आणि खोटी माहिती देत आहेत. आपली कातडी वाचविण्यासाठी ते असं म्हणाले. आवाजी मतदानाच्यावेळी आम्ही आक्षेप घेतला, निषेध केला 63 आमदार सभागृहात होते, असं कदम म्हणाले.
पाहा व्हिडिओ- काय म्हणाले रामदास कदम -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.