NCPचे मंत्री भष्ट्राचारी, पक्षाचा आमदाराचे दादांकडे बोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राम पंडागळे यांनी पक्षातील मंत्र्यांनाच घरचा आहेर दिला आहे. आमदार पंडागळे यांनी अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्यावरही आरोप केले आहेत.

Updated: Nov 7, 2012, 02:41 PM IST

www.24taas.com, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राम पंडागळे यांनी पक्षातील मंत्र्यांनाच घरचा आहेर दिला आहे. आमदार पंडागळे यांनी अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्यावरही आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री भ्रष्टाचारात अडकले असून पक्षाच्या वतीने पुणे येथील बालेवाडीत घेण्यात आलेले अधिवेशन हे भ्रष्टाचार दडपण्यासाठीच होते, असा सनसनाटी आरोप केला.
नितीन गडकरी यांना जागा द्यायची अजित पवारांना हौस होती तर त्यांनी बारामतीची जागा द्यायची होती. गोरगरिबांसाठी असलेली सरकारी जमीन का दिली? असा सवालही पंडागळे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलच्या अध्यक्षपदी प्रकाश गजभिये यांची वर्णी लावून आमदार राम पंडागळे यांना डच्चू देण्यात आला आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या पंडागळे यांनी पक्षावर तोंडसुख घेतले.
पंडागळे म्हणाले की, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना कारखान्यासाठी नियमानुसार जागा दिल्याचे अजित पवार सांगतात. आपण कुणाच्या बाला भीत नसल्याचेही सांगतात. उद्या महाराष्ट्र विकाल आणि म्हणाल कुणाच्या बाला भीत नाही, तर कसे चालेल? गडकरींना जमीन द्यायचीच होती तर तुमची बारामतीतील द्यायची, असा टोलाही त्यांनी लगावला.