राष्ट्रवादीचा जाहीरनामा जाहीर, मुंबईकरांना देणार मोफत पाणी

महापालिका निवडणुकीसाठी आता रंगत आली आहे. सर्वच पक्षात नाराजी असल्याने इकडून तिकडे उड्या मारण्याचे उद्योग सुरु झाले आहेत. सर्वात आधी शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केला. आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर केलाय. यात मुंबईकरांसाठी 700 लिटर मोफत पाणी देण्याची घोषणा मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 2, 2017, 05:05 PM IST
राष्ट्रवादीचा जाहीरनामा जाहीर, मुंबईकरांना देणार मोफत पाणी title=

मुंबई  : महापालिका निवडणुकीसाठी आता रंगत आली आहे. सर्वच पक्षात नाराजी असल्याने इकडून तिकडे उड्या मारण्याचे उद्योग सुरु झाले आहेत. सर्वात आधी शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केला. आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर केलाय. यात मुंबईकरांसाठी 700 लिटर मोफत पाणी देण्याची घोषणा मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे.

जाहीरनाम्यातील ठळक बाबी...

- 35 टक्के पेक्षा अधिक पाण्याची गळती थांबविणे, 700 लिटर मोफत पाणी देण्याची योजना.

- निरामय आरोग्य योजनेअंतर्गत वर्षाला 101 रुपये भरून शासकीय आणि खासगी रुग्णालयात आरोग्य सेवा योजना.

- ठेवी असलेल्या पैश्याचा वापर करत 18000 कोटीरुपयांचा इनशूरन्स पॉलिसी योजना.

- बेस्ट विद्युत ग्राहकाला 100 मीटर युनिट मोफत करण्याबाबत योजना.

- बेस्ट भाडे किमान करण्याबाबत योजना.

- अंतर्गत रस्ते सुकर बनविण्याची योजना.

- महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान शिक्षण देण्याची योजना.

- मेटेनेटी किंवा दिस्पेंसरी उभारणी योजना.

- मोफत वायफाय योजना.

- Sms, wtsp द्वारा कचरा हटाव मोहीम योजना