मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसतांनाच राष्ट्रवादी काँग्रेसन सर्व जागांवर लढण्याची तयारी केलीय. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्यापही जागावाटपावर तोडगा निघालेला नाही. राष्ट्रवादीनं सर्व 288 जागांवर लढण्याची तयारी केली आहे. आम्ही जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसकडून निमंत्रणाची वाट पाहतोय सन्मानजनक तोडगा निघावी, अशी आमची अपेक्षा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाव स्पष्ट केलं आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसकडे 130 ते 135 जागांचा प्रस्ताव दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे.
जागावाटपात तडजोड झाली तरी 124 पेक्षा जास्त जागा पेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीला द्यायच्या नाहित असा निर्धार काँगेसना केलाय अशी सुत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळाची तयारी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.