नेव्हीतील जवानांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नेव्हीतील चार जवानांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील कफ परेड भागात उघडकीस आली आहे. ही १४ वर्षाची अल्पवयीन शाळकरी मुलगी आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

Updated: Jul 21, 2015, 01:09 PM IST
नेव्हीतील जवानांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार title=

मुंबई : नेव्हीतील चार जवानांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील कफ परेड भागात उघडकीस आली आहे. ही १४ वर्षाची अल्पवयीन शाळकरी मुलगी आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

जानेवारी महिन्यात यातील एकाने या शाळकरी मुलीशी परिचय वाढवला आणि फुस लावून जूनच्या पहिल्या आठवड्यात तिच्यावर बलात्कार केला.
 
ही माहिती इतर तिघांना कळल्यावर त्यानी तुझ्य़ा पालकांना सांगू अशी भिती दाखवून विविध जागी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलीने घडलेला सगळा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. 

यानंतर त्वरित पालकांनी कफ परेड पोलिस स्थानकात जाऊन त्यानी तक्रार केली. नेव्हीयानंतर तील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पोलिसांनी जितेंद्रसिंग दारागोकुल वालचंद (२४), पवन ऊर्फ ओमपाल हुशारसिंग (३१) राकेश प्रसाद सिंग या तिघांना अटक केली, तर पृथ्वी उमेशसिंग चव्हाण हा बाहेरगावी गेल्यामुळे त्याला अद्यापी अटक करण्यात आली नसल्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक पाटील यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.