मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आज काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेलं नवी मुंबईचं विमानतळ २०१९पर्यंत पूर्ण होईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. ऑक्टोबर २०१५पासून नवी मुंबई विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या खास घोषणा-
# MMRDAच्या धर्तीवर पुणे परिसरात PMRDA स्थापन करणार, लवकरच अधिसूचना काढणार- मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
# गिरणी कामगारांना सदनिका: म्हाडाचे लहान भूखंड महापालिकेच्या भूखंडाबरोबर बदलणार... त्यामुळं सर्वांना सदनिका तयार करता येतील - मुख्यमंत्री
# विधानसभा: मुंबई कोस्टल रोड - कोस्टल रोडला लागून मेट्रो रेल्वे करण्याचा अभ्यास सुरू- मुख्यमंत्री
# नवी मुंबई विमानतळ: मे २०१५पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होणार... ऑक्टोबर २०१५मध्ये प्रत्यक्ष काम सुरू.... २०१९मध्ये विमान धावपट्टीवरून उडेल - मुख्यमंत्री
# २०१७ हे महाराष्ट्र भेट वर्ष (Visit maharashtra year)साजरे करणार - मुख्यमंत्री
# औरंगाबाद हा राज्यातला दुसरा पर्यटन जिल्हा जाहीर, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
# अजंठा-एलोरा संवर्धन प्रकल्पासाठी जपानच्या जायका संस्थेच्या मदतीनं ९२० कोटींचा प्रकल्प राबवणार - मुख्यमंत्री
# शिवडी-न्हावाशेवा ट्रान्सहार्बर प्रकल्प: जपानच्या जायका वित्तीय संस्थेचे कर्ज घेण्यास केंद्र सरकारची परवानगी - मुख्यमंत्री
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.