मुंबई : नाराज ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या मनधरणीचे काँग्रेसकडून पुन्हा प्रयत्न सुरु झाले आहेत. राणे दिल्लीला रवाना झाले आहेत.
नारायण राणे दिल्लीला रवाना झाले असून ते काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना राणे दिल्लीत भेटणार आहेत. त्यामुळे या भेटीत काय होते, याकडे लक्ष लागले आहे.
नारायण राणे भाजपच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चेनंतर, राणेंच्या मनधरणीसाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरुच आहेत. त्याचाच भाग म्हणून अहमद पटेल यांनी राणे यांना भेटीसाठी बोलावलं आहे.
दरम्यान, भाजपनं नारायण राणेंना पक्षात प्रवेश दिल्यास शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याच्या बातम्यांचं शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी खंडन केलंय.
अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुक उद्धव ठाकरे यांनी केलं नसल्याचं देसाईंनी कोल्हापुरात स्पष्ट केलं. शिवसेना राणेंना महत्त्वही देत नसल्याचं देसाईंनी सांगितलं.