www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नरेंद्र मोदींचा उदोउदो कऱणा-यांनी गुजरातमध्ये निघून जावं, असं म्हणत नारायण राणे यांनी मोदी समर्थकांना टोला लगावलाय. नितेश राणे यांचं वक्तव्य गुजराती समाजाविरोधात नाही, तर मोदींचा उदोउदो करणा-यांविरोधात आहे, असं राणे म्हणाले.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गृहमंत्री आर.आर. पाटील आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदुरकर यांनाही टोले लगावले. राणेंचा विषय आला की आबा चौकशीला लगेच तयार होतात, असं ते म्हणाले. तसंच चांदुरकरांनी आधी किरीट सोमय्या आणि मंगलप्रभात लोढा यांच्या विधानांची चौकशी करावी, असं नारायण राणे म्हणाले.
यापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये नितेश राणेंनी ट्विटरवरील विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. आपल्य़ा विधानाचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. शिवाय मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केलाय. मोदी समर्थकांनी गुजरातमध्ये जावं असा इशाराही त्यांनी पुन्हा दिला. तसंच गुजरातपेक्षा विकासामध्ये महाराष्ट्रच अव्वल असल्याचं नितेश यांनी म्हटलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.