राज, माहिती घेऊनच आरोप करा- नारायण राणे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यातील वाद आता आणखी चिघळला आहे. खेडमध्ये राज ठाकरेंनी नारायण राणेंवर केलेली टीका राणेंना चांगलीच झोंबली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 17, 2013, 10:14 PM IST

www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यातील वाद आता आणखी चिघळला आहे. खेडमध्ये राज ठाकरेंनी नारायण राणेंवर केलेली टीका राणेंना चांगलीच झोंबली आहे.
खेडमधल्या सभेत राज यांनी मालवणमधील जमीन व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावर राज माहिती घ्या मगच बोला असा पलटवार राणेंनी केला आहे. मालवण व सिंधुदूर्गमधील सर्व जमीन व्यवहार कायदेशीर आहेत. यापैकी एकही आरोप सिद्ध झाल्यास सार्वजनिक जीवनातून निवृत्त घेईन, असं आव्हान नारायण राणे यांनी दिलंय.

कोकणातल्या लोकांवर नारायण राणेंची दहशत आहे आणि त्यांच्याच जमिनी बळकावण्याचं कारस्थानही त्यांच्याकडूनच होतंय असा हल्ला राज ठाकरेंनी नारायण राणेंवर चढवला होता. नारायण राणे यांच्या मालवण भागात मोठ्या प्रमाणात जमिनीसाठी धमकावणी होत असते. असा आरोपही राज ठाकरेंनी या सभेत केला होता. त्यावर नारायण राणेंनी प्रत्युत्तर देताना आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे.