मुंबईकरांना शॉक...कंपन्यांचा वीजदरवाढीचा प्रस्ताव

मुंबईत ऊन वाढायला लागलंय.... याच उन्हाळ्यात मुंबईकरांना घाम फोडणारी आणखी एक बातमी..... लवकरच तुम्हाला पंख्याची किंवा एसीची हवा खाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. वीज कंपन्या मुंबईकरांना एक जबरदस्त शॉक देण्याच्या तयारीत आहेत. 

Updated: Mar 9, 2015, 11:40 PM IST
मुंबईकरांना शॉक...कंपन्यांचा वीजदरवाढीचा प्रस्ताव title=

मुंबई: मुंबईत ऊन वाढायला लागलंय.... याच उन्हाळ्यात मुंबईकरांना घाम फोडणारी आणखी एक बातमी..... लवकरच तुम्हाला पंख्याची किंवा एसीची हवा खाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. वीज कंपन्या मुंबईकरांना एक जबरदस्त शॉक देण्याच्या तयारीत आहेत. 

उन्हाळ्यात ऊन आणि घामानं मुंबईकर पुरता हैराण होतो.... आता त्यातच त्याला आणखी एक मोठ्ठा शॉक मिळणार आहे. वीजपुरवठा करणाऱ्या सगळ्याच कंपन्यांनी वीज दरवाढीचा प्रस्ताव MERCला दिलाय. 

मुंबईतली सगळ्यात मोठी वीजपुरवठादार कंपनी रिलायंस इंफ्रा  9% ते 28% दर वाढवण्याच्या विचारात आहे. तर टाटा पॉवरचा 3% ते 10% दर वाढवण्याचा प्रस्ताव आहे.  बेस्टनंही 16 टक्क्यांनी वीज दरवाढीचा प्रस्ताव दिलाय. हे नवे दर 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे. 

कंपन्यांचा खर्च वाढल्यानं वीज दरात वाढ करावी लागणार असल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे. 7 ते 10 टक्क्यांपर्यंत वीज दरवाढ होऊ शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे. मुंबईत रिलायंस इंफ्राचे 29 लाख ग्राहक आहेत. तर टाटा पॉवरचे साडे पाच लाख ग्राहक आहेत. तर साधारणपणे साडे दहा लाख ग्राहकांना बेस्टची वीज मिळते.

मुंबईमध्ये वीजेचे दर देशामध्ये सर्वाधिक आहेत. वीजेचे दर कमी करण्यासाठी जनतेबरोबरच उद्योगजगतातूनही जोरदार मागणी होतेय.... हा आवाज फक्त निवडणुकांच्या आधी सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचतो.... म्हणूनच निवडणुकीआधी वीजेवरचा सरचार्ज कमी करण्यात आला होता. पण आता पुन्हा ये रे माझ्या मागल्या.... अशीच परिस्थिती आहे.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.