आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला रेल्वेखालून सुखरूप बचावली

मुंबईच्या  घाटकोपर रेल्वे स्टेशनवर अंगाचा थरकाप उडविणारी  घटना घडलीय..आज सकाळी  लोकल ट्रेन प्लॅट फॉर्मवर येत असतांनाच  एका वृद्ध महिलेनं स्वत:ला लोकल समोर झोकून दिले..

Updated: May 25, 2016, 08:35 PM IST
आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला रेल्वेखालून सुखरूप बचावली title=

मुंबई : मुंबईच्या  घाटकोपर रेल्वे स्टेशनवर अंगाचा थरकाप उडविणारी  घटना घडलीय..आज सकाळी  लोकल ट्रेन प्लॅट फॉर्मवर येत असतांनाच  एका वृद्ध महिलेनं स्वत:ला लोकल समोर झोकून दिले..

त्या महिलेनं  आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता..लोकल ट्रेन त्या वृद्ध महिलेच्या अंगावरुन गेली...त्यामुळे तिथं उभ्या असल्या प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला.. काय झालं हे कोणालाच समजलं नाही. 

या घटनेनंतर तिथं उभ्या असलेल्या प्रवाशांनी त्या महिलेला लोकलखालून बाहेर काढलं.मात्र ती महिला त्यातून आश्चर्यकारकपणे बचावली...त्यामध्ये तिचा एक पाय जायबंदी झाला..  तिला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे..