मोदींसाठी मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक

मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ पाकिस्तानी हॅकर्सनी हॅक केलं होत. संकेतस्थळावर देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारा मजकूर अपलोड करण्यात आला होता.

Updated: May 19, 2014, 09:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ पाकिस्तानी हॅकर्सनी हॅक केलं होत. संकेतस्थळावर देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारा मजकूर अपलोड करण्यात आला होता.
हा मजकूर `ब्लेझिंग हॅकर्स पाकिस्तान` या नावाने आला होता. संकेतस्थळावर मोदीजी `पाकिस्तानच्या वाटेला येण्याआधी स्वत:ला सुरक्षित करा. तुम्ही पाकिस्तानचे काहीच वाकडं करु शकत नाही` असा अशी धमकी मजकुरात देण्यात आली होती.
तसेच पाकिस्तानतील तुमची गुप्त मोहीम आम्ही मोडून काढू, असेही मजकूरात नमूद करण्यात आले होते. मात्र मुंबई विद्यापीठाने ही गोष्ट लक्षात येताच तातडीने हा मजकूर संकेतस्थळावरुन काढून टाकला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.