दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज... लाखो मुंबईकरांना मालमत्ता करात सूट मिळणार आहे. ५०० चौरस फुटापेक्षा कमी आकाराच्या घरांना मालमत्ता करातून सूट मिळणार आहे.
त्याबाबतचे मुंबई महापालिका सुधारणा विधेयक आज विधानसभेत संमत झालं. या विधेयकामुळं मुंबईतल्या सुमारे ११ लाख घरांना मालमत्ता करात सूट मिळणाराय.
यंदाच्या वर्षी मुंबई महापालिकेनं मालमत्ता करात सुमारे ४० टक्के वाढ केली होती. मात्र आता त्यातून ५०० चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या घरांना पूर्ण करमाफी देण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.