मुंबई : नवीन वर्षात मुंबईकरांचे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकल, बेस्ट, मेट्रो, मोनोसाठी एकाच तिकिटावर प्रवास करणे सुलभ होणार आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी निविदा मागविण्यात आल्यात.
मुंबईकरांना लोकल, बेस्ट, मेट्रो, मोनोसाठी एकच तिकिट आकारण्यात येणार आहे. या एकत्रित तिकीट पद्धतीसाठी एमएमआरडीएने सल्लागारांच्या नेमणुकीसाठी निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे तिकिटांसाठी आता रांगा लावण्याची गरज भासणार नाही.
मुंबईत तिन्ही मार्गावर लोकल सेवा सुरु आहे. आता त्यात मेट्रो, मोनोची भर पडली आहे. आता नव्या वर्षात मुंबईतील प्रवासासाठी एकच तिकिट आकारण्यात येणार आहे. मुंबई आणि उपनगर प्रदेशासाठी लवकरच ही एकत्रित तिकीट पद्धती राबविण्यात येण्याचे संकेत आहे.
सल्लागार आधी केलेल्या अहवालांचा अभ्यास करणे, एकत्रित तिकिट पद्धतीची बांधणी, तंत्र यांना अंतिम स्वरूप देणे, निविदा प्रक्रिया हाताळणे व प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करणे अशा विविध जबाबदार्या या सल्लागारांवर असणार आहे, असे एमएमआरडीएच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.