मुंबई पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल यांचा राजीनामा मंजूर

डॉ. सत्यपाल सिंह यांचा मुंबई पोलिस आयुक्तपदाचा राजीनामा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी अखेर स्वीकारला आहे. मुंबई पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

Updated: Jan 31, 2014, 11:02 PM IST

डॉ. सत्यपाल सिंह यांचा मुंबई पोलिस आयुक्तपदाचा राजीनामा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी अखेर स्वीकारला आहे.
मुंबई पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
डॉ. सत्यपाल सिंह यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर त्यांच्या जागी हेमंत नगराळे हे काम पाहणार आहेत. हेमंत नगराळे यांच्याकडे हा कारभार ताप्तूर्ता देण्यात आला आहे.
डॉ. सत्यपाल सिंह हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
सत्यपाल सिंह हे उत्तरप्रदेशातून भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
मात्र सत्यपाल सिंह यांना भाजपचं तिकीट मिळणार आहे किंवा नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
उत्तर प्रदेशातल्या मेरठमधी दोन फेब्रुवारीच्या नरेंद्र मोदींच्या सभेत ते अधिकृत पक्षप्रवेश करणार आहेत.
डॉ. सत्यपाल सिंग यांच्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोण विराजमान होणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे. 

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.