बॉम्बच्या धमकीनंतर मुंबई विमानतळावर हाय अलर्ट

 मुंबईतील डोमेस्टीक आणि इंटरनॅशनल विमानतळ बॉम्ब स्फोट करून उडवून लावून अशी धमकी देणारा फोन आल्यानंतर दोन्ही विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Updated: Sep 29, 2015, 11:53 AM IST
बॉम्बच्या धमकीनंतर मुंबई विमानतळावर हाय अलर्ट  title=

मुंबई :  मुंबईतील डोमेस्टीक आणि इंटरनॅशनल विमानतळ बॉम्ब स्फोट करून उडवून लावून अशी धमकी देणारा फोन आल्यानंतर दोन्ही विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री विमानतळाच्या मॅनेजरला धमकी देणारा फोन आला, त्यात डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल आणि मुंबईच्या ताज हॉटेलवर हल्ला करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. 

एका आघाडीच्या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार कॉल करणाऱ्याने स्वतःचे नावर विशेष कुमार सांगितले होते. त्याने कंट्रोल रूमला फोन करून सांगितले की, काही लोक दहशतवादी हल्ला करणार असल्याची चर्चा करताना मी ऐकले होते. तसेच कुमार याने अधिकाऱ्यांना सांगितले की काही जणांचा ग्रुप असेही म्हणत होता की या हल्ल्याचा परिणाम २६ /११च्या हल्ला पेक्षा अधिक होणार आहे. 

सध्या बॉम्ब शोधकपथक मुंबई विमानतळाच्या परिसरात आहे आणि मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.