www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रेल्वे सुरु होण्याचा मार्ग आज मोकळा झाला. रेल्वे मंत्रालयानं आज अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र दिल्यानं आता मेट्रो रेल्वे कधीही सुरु करता येईल. मुंबईतील भाजप खासदार किरीट सोमय्या आणि गोपाळ शेट्टी यांनी रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांची आज भेट घेतली आणि मेट्रो सुरु होण्यात असलेल्या अडचणी दूर करण्याची मागणी केली.
या मेट्रोसाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं होतं पण अंतिम प्रमाणपत्रासाठीची फाईल गेले तीन महिने रेल्वे मंत्रालयाकडे पडून होती. आज रेल्वेमंत्र्यांनी तातडीने अंतिम प्रमाणपत्र देऊन मेट्रो सुरु करण्याचा मार्ग मोकळा केला. घाटकोपर वर्सोवा मेट्रो आता तातडीनं सुरु करावी अशी मागणी सोमय्या यांनी केलीय.
गेल्या तीन महिन्यांपासून यासंबंधीचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वेखात्याकडे प्रलंबित होता. किरीट सोमय्यांनी आज दिल्लीमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर मेट्रो रेल्वेच्या मार्गातील नियमांचे सर्व अडथळे दूर झालेत. याबाबतची माहिती सोमय्या यांनीच दिली. आता मुख्यमंत्री चव्हाण काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे, असे ते म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.