www.24taas.com, मुंबई
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी...... मेट्रो सज्ज झाली आहे. महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाची चाचणी 1 मे रोजी होण्याची शक्यता आहे.
वर्सोवा ते आझाद नगर या मेट्रोच्या स्थानकांदरम्यान ही चाचणी होत आहे. चाचणीसाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता झालीय. मेट्रो रेल्वे पहिल्या जाहीर चाचणीसाठी सज्ज झालीय. रिलायन्स मेट्रो वनच्या अधिका-यांनी ही माहिती दिली. मुंबईतल्या मेट्रोच्या पहिल्या चाचणीसाठी मुख्यमंत्री उपस्थित राहावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र अजुनही मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळ मिळाली नसल्याची सुत्रांची माहिती आहे.
सुमारे 11 किलोमीटर लांबीच्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो मार्गाच्या कामाला फेब्रुवारी 2008मध्ये सुरुवात झाली. अनेक अडथळे पार करत, अपघातांच्या घटनांनंतर आणि महत्त्वाचं म्हणजे प्रकल्प पुर्ण होण्याच्या अनेक डेडलाईन पार करणा-या मेट्रोच्या चाचणीचा दिवस अखेर जवळ आलाय. ही चाचणी यशस्वी झाली तर सप्टेंबरपासून मेट्रो धावू शकणार आहे.