मुंबई : मेट्रोचे तिकीट दर ८ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचे मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिलेत. तर फेअर फिक्सेशन समिती स्थापन करण्यासाठी ३१ जानेवारी पर्यंतची शेवटी मुदत न्यायालयाने केंद्र सरकारला दिलीये.
आता पुढील सुनावणी ७ जानेवारीला ठेवली आहे. मेट्रो ट्रेनचे दर अवाजवी असून, त्याच बदल करण्यात येऊ नये आणि सामान्य नागरीकांना परवडेल असे तिकिट दर असावेत अशा आशयाची याचिका आघाडी सरकारने केली होती. त्यावर न्यायालयाने फेअर फिक्सेशन समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते.
अजून ती समिती स्थापन झाली नाही. दरम्यान याबाबत केंद्र सरकारने लवकरात लवकर पावले उचलीवीत असं न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावले आहे. या प्रकणाची पुढील सुनावणी आता ७ जानेवारीला होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.