मुंबई : भांडूप स्थानकाजवळ लोकलच्या डब्यातच एका महिलेची प्रसुती झाल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली, त्यावेळी ही घटना घडली.
मध्य रेल्वे मार्गावर भांडूप स्थानकाजवळ रखडलेल्या लोकलच्या डब्यात गुडीया प्रमोद गुप्ता या महिलेने बाळाला जन्म दिला. गुडीया गुप्ता या दिव्याहून सीएसटीकडे जात होत्या.
गुडीया गुप्ता यांना भांडूप येथील सावित्रीबाई प्रसुतीगृहात दाखल करण्यात आले आहे. गुडीया यांना मुलगी झाली आहे, तिची प्रकृती उत्तम आहे. गुडीया यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुलीचे वजन २ किलो ७०० ग्रॅम आहे.