मुंबईच्या एन्ट्री पॉईंट, कोल्हापूर शहराचा टोल रद्द करण्याची सरकारची भूमिका

कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातला टोल रद्द करण्याची सरकारची भूमिका दिसत आहे. मतांसाठी भाजपची खेळी असल्याची चर्चा आहे. तसचे मुंबईच्या एन्ट्री पॉईटबाबतही निवडणुकीच्या तोंडावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

Updated: Aug 28, 2015, 07:32 PM IST
मुंबईच्या एन्ट्री पॉईंट, कोल्हापूर  शहराचा टोल रद्द करण्याची सरकारची भूमिका title=
संग्रहीत

मुंबई : कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातला टोल रद्द करण्याची सरकारची भूमिका दिसत आहे. मतांसाठी भाजपची खेळी असल्याची चर्चा आहे. तसचे मुंबईच्या एन्ट्री पॉईटबाबतही निवडणुकीच्या तोंडावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर टोल रद्द करण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतलीय. याच धर्तीवर मुंबईच्या एन्ट्री पॉईंटच्या पाच टोलनाक्यांबाबतचा निर्णयही घेण्याची सरकारची तयारी असल्याचं समजतंय. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे रणंशिंग वाजलंय.या निवडणुकीत कोल्हापूरकरांची मतं आपल्या पारड्यात पडावी म्हणून सत्ताधारी पक्षातर्फे मोर्चेबांधणी सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूरचा टोल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

गेल्या नऊ महिन्यांपासून कोल्हापूरच्या टोलनाक्यांचा प्रश्न समिती आणि बैठकांच्या पलीकडे प्रगती नव्हती... आधी निर्णय घेतला तर त्याचा फायदा कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत होणार नाही अशी शिवसेना-भाजपाचा कयास होता. निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला निर्णय मतदारांच्या लक्षात राहतो, त्या आधी घेतलेले निर्णय लोक विसरतात हा अनुभव राजकर्त्यांना चांगलाच आहे. त्यामुळेच आता कोल्हापूरच्या धर्तीवर मुंबईतील पाच टोलनाक्यांबाबतही तिच भूमिका घेण्याचा विचार सरकार करत आहे. २०१७ च्या सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेसाठी निवडणुक होत आहे. तोपर्यंत समिती आणि बैठकांमध्ये मुंबई टोलनाक्यांचा निर्णय लांबवण्याची शिवसेना-भाजपाची रणनिती आहे. 

मुंबईतील एन्ट्री पॉईंटच्या पाच टोलनाक्यांवर लहान वाहनांना सुट देण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील लाखो वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे. लहान वाहनधारकांना हा दिलासा द्यायचा तर त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना मिळायला हवाच. म्हणून मुंबईतील पाच टोल नाक्यांबाबतचा निर्णय घ्यायला निवडणुकीच्या तोंडावरचा मुहुर्त सत्ताधारी साधण्याची शक्यता अधिक आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.