फ्लिपकार्ट घेणार मुंबईच्या डबेवाल्यांची मदत

ई-कॉमर्समधील आघाडीवर असणाऱ्या फ्लिपकार्ट कंपनीने मुंबईतील डबेवाल्यांशी करार करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पहिली बैठक मुंबईत पार पडली. फ्लिपकार्ट डबेवाल्यांची मदत घेणार आहे.

Updated: Apr 11, 2015, 09:42 AM IST
फ्लिपकार्ट घेणार मुंबईच्या डबेवाल्यांची मदत title=

मुंबई : ई-कॉमर्समधील आघाडीवर असणाऱ्या फ्लिपकार्ट कंपनीने मुंबईतील डबेवाल्यांशी करार करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पहिली बैठक मुंबईत पार पडली. फ्लिपकार्ट डबेवाल्यांची मदत घेणार आहे.

'मॅनेजमेंट गुरू' म्हणून जगविख्यात असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांची मदत आता ऑनलाईन ट्रेडिंगमधील 'फ्लिपकार्ट' कंपनी घेत आहे. डबे पोहोचवतानाच फ्लिपकार्ट कंपनीच्या मालाची डिलिव्हरीही हे डबेवाले ग्राहकांपर्यंत करणार आहेत. 

फ्लिपकार्ट आपल्या 'ई-कार्ट लॉजिस्टिक' या डिलिव्हरी नेटवर्कसाठी मुंबईच्या डबेवाल्यांशी पार्टनरशिप करणार आहे. फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी हबमधून डबेवाले माल घेतील आणि डब्यांची डिलिव्हरी करता-करता या मालाचीही डिलिव्हरी करतील. 

दरम्यान, डिलिव्हरी कोणत्या मालाची करायची आणि त्यासाठी काय चार्जेस लावायचे याबाबत आज शुक्रवारी फ्लिपकार्टच्या अधिकार्‍यांशी चर्चा करणार असल्याचे सुभाष तळेकर यांनी स्पष्ट केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.