मुंबई मनपाची वादग्रस्त कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट

मुंबई महापालिकेत घोटाळ्यातील आरोपी असलेल्या वादग्रस्त कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट देण्याचा कारनामा मुंबई महापालिकेनं केला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

Updated: May 4, 2016, 08:58 PM IST
मुंबई मनपाची वादग्रस्त कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट title=

मुंबई : मुंबई महापालिकेत घोटाळ्यातील आरोपी असलेल्या वादग्रस्त कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट देण्याचा कारनामा मुंबई महापालिकेनं केला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

जे कुमार आणि आर.पी.एस या घोटाळ्याचे गुन्हे दाखल झालेल्या कंत्राटदारांनाच पुन्हा पुलाच्या बांधकामांची कंत्राटं देण्यात आली. या निर्णयाचा विरोधकांनी निषेध करत सभात्याग केला. हँकॉक ब्रीज, वर्सोवा, धारावी आणि विक्रोळीच्या मोठ्या ब्रीजचे कंत्राटं या वादग्रस्त कंत्राटदारांना देण्यात आली आहेत. त्यामुळं मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.