लतादीदींचे पुरस्कार काढून घ्या, मुंबई काँग्रेस अध्यक्षांची मागणी

पद्म पुरस्कारावरून निर्माण झालेल्या वादावर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदुरकरांनी कुणाचंही नाव न घेता नव्या वादाला तोंड फोडलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 12, 2013, 04:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पद्म पुरस्कारावरून निर्माण झालेल्या वादावर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदुरकरांनी कुणाचंही नाव न घेता नव्या वादाला तोंड फोडलंय.
गुजरातमध्ये ज्यांनी जातीय उद्रेक घडवला त्या पक्षांना आणि नेत्यांना जाहीर पाठिंबा देणाऱ्यांना दिलेले पद्मश्री, पद्मभूषण आणि भारतरत्नसारखे नागरी पुरस्कार तत्काळ काढून घ्यावेत अशी मागणी जनार्दन चांदुरकर यांनी केलीय.
चांदूरकर यांनी ही मागणी करताना थेट लता मंगेशकर यांचं नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या मागणीचा रोख त्यांच्याकडंच असल्याचं स्पष्ट होतंय. काही दिवसांपूर्वी पुण्यात नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा लता मंगेशकर यांनी व्यक्त केली होती.
त्यानंतर आता चांदुरकरांनी अशी मागणी केलीय. तसंच असे प्रकार थांबले नाहीत तर मुंबई काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.