गाडी चोरुन नेण्याचा चोरांचा डाव फसला

माझगावमध्ये शुक्रवारी रात्री चोरांनी स्कॉर्पिओ गाडी चोरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र गाडीला गियर लॉक असल्यामुळे त्यांचा गाडी चोरुन नेण्याचा डाव फसला. चोरांची ही सर्व खटाटोप सीसीटीव्हीत कैद झालाय.

Updated: May 29, 2016, 11:27 PM IST
गाडी चोरुन नेण्याचा चोरांचा डाव फसला title=

मुंबई : माझगावमध्ये शुक्रवारी रात्री चोरांनी स्कॉर्पिओ गाडी चोरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र गाडीला गियर लॉक असल्यामुळे त्यांचा गाडी चोरुन नेण्याचा डाव फसला. चोरांची ही सर्व खटाटोप सीसीटीव्हीत कैद झालाय.

माझगाव टॉवर समोरच्या रस्त्यावरची फोर व्हिलर गाडी चोरून नेण्यासाठी चोरटेही फोर व्हिलरमधूनच आले होते. रात्री दोन वाजल्यापासून पाऊणे तीन वाजेपर्यंत ते गाडी चोरुन नेण्याचा खटाटोप करत होते. त्यासाठी गाडीचा दरवाजा उघडून त्यांनी गाडी सुरुही केली. मात्र गाडी रिव्हर्स गियरमध्ये होती आणि त्याला गियर लॉकही बसवण्यात आला होता. त्यामुळं चोरांना हा लॉक काही केल्या उघडता आला नाही. त्यामुळे चोरांनी रागातून गाडीच्या अंतर्गत भागाची मोडतोड केली.

गाडीमालक प्रसाद तांडेल यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. मात्र पोलिसांनी घटनास्थळी येण्याचीही साधी तसदीही घेतली नाही.

पाहा व्हिडिओ