शालेय दप्तराच्या ओझ्याबाबत सरकारलाही आली जाग

शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याबाबत झी मीडियानं दाखवलेल्या रियालिटी चेकनंतर सरकारलाही जाग आलीय... दप्तराचं हे पाच-पाच किलोचं ओझं कमी करण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे पुढं सरसावलेत... पण त्यासाठी देखील आणखी दीड वर्षं वाट पाहावी लागणार आहे.

Updated: Feb 13, 2015, 11:49 PM IST

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याबाबत झी मीडियानं दाखवलेल्या रियालिटी चेकनंतर सरकारलाही जाग आलीय... दप्तराचं हे पाच-पाच किलोचं ओझं कमी करण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे पुढं सरसावलेत... पण त्यासाठी देखील आणखी दीड वर्षं वाट पाहावी लागणार आहे.

शाळकरी विद्यार्थी की कोवळे 'हमाल'? मुलांच्या पाठीवर 5-6 किलोचं दप्तराचं ओझं आदी प्रश्न होते. ओ रे ओझ्याचा. शाळेत पाय ठेवल्यानंतर मुलांना पहिला धडा मिळतो तो हाच. कोवळ्या वयातल्या या शाळकरी मुलांना 5 ते 6 किलो वजनाचं दप्तराचं ओझं वाहायला लागतं. 'झी मीडिया'नं जेव्हा याबाबतचा रियालिटी चेक केला तेव्हा हेच धक्कादायक वास्तव समोर आलं. 

झी मीडियानं डोळे उघडल्यानंतर, आता सरकारलाही जाग आलीय. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी मुंबईतल्या विविध शाळांमध्ये जाऊन मुलांच्या दप्तराच्या ओझ्याचं रियालिटी चेक केलं. तेव्हा त्यांनाही त्यातलं गांभीर्य लक्षात आलं. विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचा मुद्दा लावून धरल्याबद्दल त्यांनी 'झी मीडिया'ला खास धन्यवादही दिले.

 शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना सुचवल्या ख-या... मात्र हे ओझं हलकं होण्यासाठी बिच्चा-या विद्यार्थ्यांना आणखी दीड वर्षं वाट पाहावी लागणार आहे जून 2016 पर्यंत.

 आता जो प्रश्न पुढच्या शैक्षणिक वर्षापासून सुटू शकतो, त्यासाठी सरकारी समित्यांचे सोपस्कार हवेतच कशाला? तावडेजी, केवळ शाळांमध्ये रियालिटी चेक करून तुमची जबाबदारी संपणार नाही. तुम्ही मनावर घेतलं तर हे ओझं चुटकीसरशी हलकं होऊ शकतं. मुलांना शाळेची गोडी लागावी, यासाठी एवढं तुम्ही मनावर घ्याच.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.