सावधान! मुंबईत बुरखाधारी महिला चोरांची टोळी सक्रीय

मुंबईत सध्या बुरखाधारी महिलांची एक टोळी चोऱ्या करून धुमाकूळ घालतेय. विशेष म्हणजे ही टोळी बुरखा परिधान करून असल्यामुळे सीसीटीव्हीत काहीच दिसत नाही.  

Updated: Nov 18, 2015, 04:03 PM IST
सावधान! मुंबईत बुरखाधारी महिला चोरांची टोळी सक्रीय title=

अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई: मुंबईत सध्या बुरखाधारी महिलांची एक टोळी चोऱ्या करून धुमाकूळ घालतेय. विशेष म्हणजे ही टोळी बुरखा परिधान करून असल्यामुळे सीसीटीव्हीत काहीच दिसत नाही.  

वांद्रे पूर्व इथे मुकेश ज्वेलर्स नावाच्या दुकानात बुरघाधारी टोळीनं आपलं लक्ष केलं. दुपारी दीड वाजता मालक आणि कर्मचारी दोघंही दुकानात असताना बुरखा घातलेल्या तीन महिला दुकानात आल्या. कानातले दाखवण्याची त्यांनी मागणी केली. ग्राहक समजून दुकानदार त्यांना कानातले असलेले बॉक्स दाखवू लागला. त्यावेळी या महिलांनी शिताफीने एकमेकांना इशारा करत त्यातला एक बॉक्स चोरला.

ही चोरी इथेच संपत नाही. पकडले जाण्याच्या भीतीने मागे बसलेली महिला बुरख्यात लपवलेला बॉक्स बाहेर काढते आणि टेबलाच्या आडोश्याने लपवते. मालक आणि नोकर दुकानात असताना हा प्रकार सुरू आहे. त्यानंतर त्यातली एक महिला रिक्षा बोलावते. रिक्षा दुकानापाशी आल्यावर पुन्हा शिताफीने या महिलेनं बॉक्स पळवला. ही चोरी पकडली जात नाही... कारण बुरखा... 

महिलांच्या या टोळीने सध्या चोऱ्या करून धुमाकूळ घातलाय. पण बुरखा घातला असल्यामुळे त्या पकडल्याच जात नाहीयेत. सीसीटीव्हीही निष्प्रभ ठरतायेत. कारण सीसीटीव्हीत दिसतो फक्त बुरखा... त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा कसा असा प्रश्न दुकानदारांना पडलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.