पाक कलाकारांच्या बंदीवर असं काही बोलले मुकेश अंबानी

 भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदीच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबनी यांनी म्हटले की देशाबद्दल प्रथम बोलले पाहिजे नंतर कला आणि संस्कृतीबद्दल चर्चा केली पाहिजे. 

Updated: Oct 18, 2016, 07:42 PM IST
पाक कलाकारांच्या बंदीवर असं काही बोलले मुकेश अंबानी  title=

मुंबई :  भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदीच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबनी यांनी म्हटले की देशाबद्दल प्रथम बोलले पाहिजे नंतर कला आणि संस्कृतीबद्दल चर्चा केली पाहिजे. 

अंबानी यांनी समवारी रात्री स्पष्ट केले की माझ्या मनात कोणतीच शंका नाही की माझ्यासाठी माझा देश सर्वात पहिल्या प्राध्यान ठेवतो. 

मी बुद्धीवादी व्यक्ती नाही, त्यामुळे अशावेळी मला या गोष्टी समजत नाही. पण सर्व भारतीयांप्रमाणे माझ्यासाठी भारत हा सर्वात प्रथम आहे. 

एका डिजिटल मीडियाने आयोजित एका कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी पाकिस्तानी अभिनेते आणि कलाकारांबद्दल विचारले गेले. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. 

तुम्ही राजकारणात जाणार का असे विचारल्यावर मुकेश अंबानी यांनी नाही असे उत्तर दिले. मी राजकारणासाठी नाही बनलो आहे.