मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर सुट्टीच्या दिवशी अवजड वाहनांना बंदी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सुट्टीच्या दिवशी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खालापूर टोल प्लाझा ते उर्से टोल प्लाझा दरम्यान अवजड वाहनांना बंदी असणार आहे.

Updated: Oct 18, 2016, 07:38 PM IST
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर सुट्टीच्या दिवशी अवजड वाहनांना बंदी title=

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सुट्टीच्या दिवशी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खालापूर टोल प्लाझा ते उर्से टोल प्लाझा दरम्यान अवजड वाहनांना बंदी असणार आहे.

तीन ॲक्सल, मल्टी ॲक्सल व ओडीसी वाहनांना विशिष्ट वेळेत प्रवेश बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) आर. के. पद्मनाभन यांनी दिली आहे.  

मुंबई-पुणेच्या दिशेने - शुक्रवारी संध्याकाळी किंवा दोनपेक्षा अधिक सुट्ट्या सुरु होण्याच्या आदल्या दिवशीच्या संध्याकाळी 6.00 ते 9.00 वा. पर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली असून शनिवारी सकाळी किंवा दोन व त्यापेक्षा अधिक सुट्ट्या सुरु होण्याच्या दिवशी सकाळी 8.00 ते दु. 12.00 वा. पर्यंत  याप्रमाणे वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

पुणे-मुंबईच्या दिशेने - रविवारी संध्याकाळी किंवा सुट्ट्या समाप्त होण्याच्या शेवटच्या दिवशीच्या संध्याकाळी 5 ते रात्रौ 8.00 वा. पर्यंत तसेच कुसगांव येथे NH 04 वर व उर्से येथे द्रुतगती मार्गावर डाव्या बाजूला सोमवारी सकाळी किंवा सुट्‌ट्यानंतरच्या पहिल्या कार्यालयीन दिनाच्या सकाळी 6.30 ते 09.30 वा.पर्यंत वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.