मोहन भागवत यांच्या पंतप्रधान मोदींना कानपिचक्या

सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कानपिचक्या दिल्या. विजय आणि पराक्रमापेक्षा अखेर विचारच महत्त्वाचे असतात अशा शब्दात सरसंघचालकांनी मोदींना नाव न घेता कानपिचक्या दिल्या.

Updated: Feb 27, 2015, 12:32 PM IST
मोहन भागवत यांच्या पंतप्रधान मोदींना कानपिचक्या  title=

मुंबई : सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कानपिचक्या दिल्या. विजय आणि पराक्रमापेक्षा अखेर विचारच महत्त्वाचे असतात अशा शब्दात सरसंघचालकांनी मोदींना नाव न घेता कानपिचक्या दिल्या.

भागवत यांनी त्यासाठी उदाहरण दिलं डॉ. हेडगेवारा यांचे. डॉ. हेडगेवार फारसे प्रसिद्ध नव्हते.  हेडगेवारांपेक्षा मोहन भागवतांना जास्त लोक ओळखत असतील पण अखेर व्यक्ती नाही विचारांकडेच जावं लागतं, असं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईत आयोजीत कार्यक्रमात भागवत बोलत होते. 

पंतप्रधान मोदींवर आरएसएसने जाहीर टीका केल्याने चर्चा अधिकच रंगली आहे. मोदी प्रसिद्धीला जास्त भर देत असल्याचे या टीकेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता मोदी या टीकाला उत्तर देतील का, याची चर्चा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.