मुंबई : विधानसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर मनसेपासून दुरावलेल्या मनसेच्या चार माजी आमदारांचा भाजपमधील बहुप्रतीक्षीत प्रवेश सोहळा मुबंईत आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झाला.
यात नाशिकचे माजी आमदार वसंत गिते, प्रवीण दरेकर, इगतपुरीचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांचा समावेश आहे. या प्रवेशाने मनसेला जोरदार झटका बसलाय. भाजप प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
विधानसभा निवडणुकीत मनसेच्या निराशाजनक कामगिरीनंतर सरचिटणीस असलेले प्रवीण दरेकर, वसंत गितेनी नोव्हेंबरमध्येच मनसेच्या सरचिटणीसपदाचे राजीनामे दिले होते. दरेकर आणि गिते हे दोघेही पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या दोघांचाही राजीनामा स्वीकारत सर्वांनाच धक्का दिला होता.
गितेंना भाजपच्या स्थानिक आमदारांचा विरोध असल्यानं हा प्रवेश सोहळा रखडला होता. अखेरीस आज प्रवीण दरेकर, वसंत गिते, मनसेचे माजी आमदार रमेश पाटील, इगतपुरीचे काशीनाथ मेगांळ हे भाजपामध्ये प्रवेश केला आहे. १२ जिल्हा अध्यक्ष, चार जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असे हजारो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झालेत, अशी माहिती दानवे यांनी यावेळी दिली. माजी आमदारांसह त्यांचे समर्थक भाजपमध्ये दाखल झाले आहे. त्यांचे स्वागत दानवे यांनी केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.