मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीपर्वी मनसेला लागलेली गळती थांबत नाही आहे. आज दादर विभागातील मनसेचे माजी विभाग प्रमुख प्रकाश पाटणकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री निवास्थानी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थीत हे पक्ष प्रवेश झालेत. प्रकाश पाटणकर यांच्या प्रवेशामुळे मनसेची सर्वाधीक ताकद असलेल्या दादर विभागाला खिंडार पडलं आहे.
शिवसेनेमध्ये प्रवेश करताना प्रकाश पाटणकर यांनी मनसेवर आरोप केले आहेत. काम करणाऱ्यांऐवजी बडबड करणाऱ्यांनाच मनसेमध्ये संधी मिळते अशी टीका पाटणकर यांनी केली आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये माहीम विधानसभा क्षेत्रातल्या शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धारही पाटणकर यांनी केला आहे.
दरम्यान मागच्या निवडणुकीत अपघातामुळे मनसे नगरसेवक निवडून आले, यंदा मात्र चित्र बदलेल असा विश्वास दादरचे शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी व्यक्त केला आहे.