मनसे अध्यक्ष लवकरच 'संपादक राज ठाकरे'

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच एक वृत्तपत्र प्रकाशित करण्याच्या विचारात असल्याचं सांगण्यात येत आहे, त्यामुळे राज ठाकरे हे यापुढे आपल्याला संपादकाच्या भूमिकेतही दिसून येणार आहेत.

Updated: Feb 17, 2015, 11:50 PM IST
मनसे अध्यक्ष लवकरच 'संपादक राज ठाकरे' title=

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच एक वृत्तपत्र प्रकाशित करण्याच्या विचारात असल्याचं सांगण्यात येत आहे, त्यामुळे राज ठाकरे हे यापुढे आपल्याला संपादकाच्या भूमिकेतही दिसून येणार आहेत.

राज ठाकरे यांनी सध्या व्यंगचित्रांचाही धडाका लावला आहे, राज ठाकरे यांची संपादकीय, भूमिका तसेच त्यांचे व्यंगचित्रही आपल्याला या नव्या वृत्तपत्राच्या माध्यमातून पाहता येणार आहेत.

हे वृत्तपत्र व्यावसायिक तसेच पक्षाचं मुखपत्र अशा स्वरूपाचं असणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.