मुंबई : शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी एका महिलेवर हात उगारल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा हात मोबाईलवर शूट करणाऱ्यासाठी उगारला असल्याचं सांगण्यात येत आहे.
मोबाईल क्लिपमध्ये सदा सरवणकर महिलांच्या घोळक्यापुढे उभे असून त्यांच्याशी बोलताना दिसत आहेत. त्यावेळी एक जण मोबाईलर शूटिंग करत होता. त्याला आक्षेप घेत सदा सरवणकर यांनी त्यांच्या मोबाइलवर हात उचलला.
मात्र, तो हात तिथे उभ्या असलेल्या एका महिलेला चुकून लागला. या सर्व घटनेची दृश्ये दुसऱ्या बाजूने चित्रीकरण करणाऱ्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.