मुंबई : दूध उत्पादकांना दर कमी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. महानंदाचे दर 2 ते पाच रूपयांनी कमी करण्यात येणार आहेत. याबाबत दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी तशी घोषणा केली आहे.
राज्यात दुधाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. महानंदच्या दुधाचे दर 2 ते 5 रुपयांनी कमी करण्याची घोषणा सरकारनं केली आहे. तसंच अन्य दूध उत्पादकांनाही दर घटवण्याचे आदेश देण्यात आल्याचं दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलंय.
दूध उत्पादक शेतक-यांना रास्त भाव मिळवून देण्यासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्या होत्या. दूध उत्पादक शेतक-यांना शासकीय दर न देणा-या दूध संघांवर कारवाई करण्याचा इशारा खडसे यांनी दिला होता. तसंच २० रुपयांपेक्षा कमी दर देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. त्याचवेळी आता दुधाचे दर कमी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दूध कंपन्या दर कमी करतात का, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, तसंच यासंदर्भात लवकरच कायदा करणार असून उद्याच अध्यादेश आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही खडसेंनी सांगितलंय. दूध दराबाबत विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी बैठक बोलावलेली होती. या बैठकीला अधिकारी आणि दुग्धविकासमंत्री उपस्थित होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.