'भारत माते'बाबत आक्षेपार्ह विधान, एमआयएमचे आमदार पठाण निलंबित

 एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी 'भारत माते'बाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.  

Updated: Mar 16, 2016, 06:22 PM IST
'भारत माते'बाबत आक्षेपार्ह विधान, एमआयएमचे आमदार पठाण निलंबित title=

मुंबई : 'भारत माता की जय'चा वाद आता विधानसभेत येऊन पोहोचलाय. एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी 'भारत माते'बाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.  

वारिस पठाण यांच्याविरोधात सत्ताधारी आणि विरोधक आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. वारिस पठाण यांचं निलंबन करण्यात यावे, अशी जोरदार मागणी केली. 

यावर संसदीय कार्यमंत्र्यांनी पठाण यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला आणि त्याचा अध्यक्षांनी परवानगी देत अधिवेशन काळात पठाण यांच्या निलंबनाची घोषणा केली. 

तसंच विधानभवनाच्या आवारातही येण्यास पठाण यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर 'भारत माता की जय' म्हणणे ही आरएसएसची विचारसरणी असून आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं वारिस पठाण यांनी स्पष्ट केले.