आता, दूधपट्टी करणार 'दूध का दूध...'

आता घरबसल्या दूधात भेसळ झाली आहे की नाही ते तपासून पाहणं शक्य होणार आहे. 

Updated: Jun 13, 2015, 08:48 PM IST
आता, दूधपट्टी करणार 'दूध का दूध...' title=

मुंबई : आता घरबसल्या दूधात भेसळ झाली आहे की नाही ते तपासून पाहणं शक्य होणार आहे. 

दुधातील भेसळ शोधून काढू शकणारी विशेष दूधपट्टी तयार करण्याचे काम अन्न आणि औषध प्रशासनानं हाती घेतलंय. दूधात भेसळ झाली आहे का? झाली असल्यास त्यात काय मिसळण्यात आलंय? त्याचं प्रमाण किती असेल? याची छाननी घरच्या घरी करणं ग्राहकांना या दूधपट्टीमुळं शक्य होणार आहे.

येत्या तीन महिन्यांत ही पट्टी तयार करण्याचे काम करण्यात येणार असून सामान्यांना परवडेल अशा किंमतीत त्या उपलब्ध होतील.

भेसळयुक्त दूधाचा महापूर रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं दूधपट्टीच्या माध्यामातून एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.