मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Updated: Nov 13, 2016, 07:32 AM IST
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक title=

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वेवर मुलुंड माटुंगामध्ये अप स्लो, हार्बरवर सीएसटी ते चुनाभट्टी आणि माहीम स्थानकापर्यंत अप-डाऊन मार्गावरही मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

तर पश्चिम रेल्वेवर सकाळी 10.35 ते दु. 3.35 या कालावधीत मेगाब्लॉक असणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन फास्ट मार्गावर हा मेगाब्लॉक असेल. या काळात अप आणि डाऊन फास्ट लोकल स्लो मार्गावर चालतील.