मुंबई : जम्बो मेगाब्लॉक आज संपला आहे. १८ तासांचा हा मेगा ब्लॉक संपल्यानंतर, छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन पहिली लोकल धावली आहे. यानंतर मुंबईची लाईफलाईन सुरळीत झाली.
मध्य रेल्वे मार्गावर मशीदबंदर रेल्वे स्थानकाजवळ असलेला १३६ वर्ष जुना हँकॉक पूल पाडण्याच काम पूर्ण झाले असून सीएसटीवरुन ६.२० मिनिटांनी पहिली लोकल सुटली आहे, पूल पाडण्याचं काम सुरू असल्याने हा मोठा मेगाब्लॉक घेण्यात आला.
पूल पाडण्याच्या कामाला शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून सुरुवात झाली होती. हा पूल तोडण्यासाठी मोठया प्रमाणावर मनुष्यबळाचा वापर करण्यात आला, जवळपास चारशे ते सहाशे कामगार आणि अधिकारी या कामात गुंतले होते. या जम्बो मेगाब्लॉकमुळे १०० हून अधिक लोकल आणि ४२ लांब पल्ल्याच्या गाडया रद्द करण्यात आल्या होत्या.
शनिवार आणि रविवार असा सुट्टीचा दिवस पाहून रेल्वेने जम्बो मेगाब्लॉक घेतला होता.१८ तासांच्या मेगाब्लॉक मुळे मुंबईची लाइफलाइन पुर्णपणे ढासळली गेली होती, त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले, काही जणांनी तर घरीच राहणे पसंद केले.